HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाचा काळ संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र दौरा, पंकजा मुंडेंचा एल्गार

बीड | ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जोरदार राजकारण रंगलंय. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसींचं आरक्षण परत मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार केलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या 7 व्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावरील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मोठी घोषणा केली. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं त्यांनी आज (३ जून) जाहीर केलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते डाक पाकिटाचं अनावरण करण्यात आलं. गोपीनाथ गडावरुन आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावरुन पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर तोड डागली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावरुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मुंडेसाहेब आज असते तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. पण आज मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. ओबीसी समाजाला न्याय मिळायला हवा. न्याय मागणारा पेटून उठला की न्याय मिळतो. कोरोनाचं संकट दूर झाल्यावर महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावरुन केलीय.

‘पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार’- पंकजा मुंडे

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एक पत्र लिहिणार असल्याची माहिती पंकजा यांनी यावेळी दिली. त्यात ओबीसींची जनगणना करा, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ज्याला रोजगार नाही त्याला रोजगार द्या, अशा 3 आशयाचं पत्र आपण पंतप्रधानांना लिहिणार असल्याची त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्या नावातील “अ” मृतावस्थेत जावू देवू नका, शिवसेनेकडून अमृता फडणवीसांना सणसणीत उत्तर

swarit

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाला जनादेश मिळाला आहे !

News Desk

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार?

News Desk