HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आता असताना आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची आज (२ जून) भेट घेतली आहे. दरम्यान एकीकडे फडणवीसांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी काल (१ जून) जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.

 

एकनाथ खडसे आणि फडणवीसांमध्येही बोलणं झालं – रक्षा खडसे

३१ मे रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. फडणवीसांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठा पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.

शरद पवार भेटीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून ही केवळ सदिच्छा भेट होती,” असं देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.

फडणवीसांवर खडसेंनी केले होते गंभीर आरोप

एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. याचसोबत त्यांनी एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा गंभीर आरोपही केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या भाजपच्या त्या ७ नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई होणार

News Desk

साकीनाका बलात्कार प्रकरण, रामदास आठवले पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार, RPIतर्फे 1 लाख रुपयांची मदत!

News Desk

विराट-अनुष्काला ‘कन्यारत्न’!

News Desk