HW News Marathi
महाराष्ट्र

तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर टीका

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (२ जून) भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.

निवडणुकांवरून संभ्रम नको राऊत यांनी दिला सल्ला

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षाला निवडणुकीची एवढी घाई का झाली आहे. त्यांना कुणी सांगितलं अशाप्रकारचा काही निर्णय होत आहेत? त्यांच्या हेरांनी… ज्या काही गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली असेल तर ती चुकीची आहे. निवडणुकांचं काय होणार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तच सांगतील. ते अधिकारीक व्यक्ती आहेत. तुम्ही कशाला जनतेत संभ्रम निर्माण करत आहात, असा सवालही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भागवतांकडून भाजपाची पाठराखण

News Desk

‘भाजप’ केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने चिडीचा खेळ खेळतय! – नाना पटोले

Aprna

गोपिनाथ मुंडे,एक नावाजलेला ‘लोकनेता’!

swarit