HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजीराजेंना राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी द्यावा,भाजपमध्ये पुर्ण स्वातंत्र्य !

पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी छत्रपती यांनी राजीनामा दिल्यास त्याचा कोणावर परिणाम होणार आहे? हे सरकार कोडगं आहे. त्यांना काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्‍हणाले, आमच्या पक्षात संभाजीराजे यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.

चंद्रकांत पाटील हे मीडियाशी बोलत होते. संभाजीराजेंनी राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे? महाराष्ट्रातील सरकार कोडगं आहे. त्यांना काही फरक पडणार नाही, असं पाटील म्हणाले. तसेच संभाजी छत्रपती यांची हेरगिरी सुरू असल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला. संभाजी छत्रपती यांची हेरगिरी होत असेल तर ही गोष्ट निषेधार्ह आहे. या संदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

फडणवीस-पवार भेटीबाबत पाटील म्‍हणाले…,

यासोबतच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात पाटील म्हणाले, ही केवळ सदिच्छा भेट होती. कोणताही राजकीय हेतू नव्हता. पवार आजारी असल्याने फडणवीसांनी सुप्रिया सुळे यांना भेटीसाठी विनंती केली होती. फडणवीस केवळ तब्येतीची चर्चा करायाला गेले होते, असे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, जळगावमध्ये झालेल्या नुकसाणीची पाहणी करण्यासाठी फडणवीस जळगाव दौर्‍यावर असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

आरक्षणासाठी संघर्ष करायचा नाही हे आम्हाला मान्य नाही

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली. मराठा आरक्षण लगेच मिळावं, मराठा समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जो जो व्यक्ती संघर्ष करेल. त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हे आम्ही दहावेळा सांगितलं आहे. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजेंनी आरक्षण मिळालं पाहिजे, पण संघर्ष न करता मिळालं पाहिजे, असं स्पष्ट केलं आहे.

आरक्षणासाठी संघर्ष करायचा की नाही हे कोविड संपल्यावर बघू असं त्यांनी सांगितलं आहे. हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

कोविड आणि आरक्षणाचा काय संबंध?

कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. जनजीवन व्यवस्थित सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. दोन हाताने खाणं सुरू आहे. तरीही मराठा समाजाने रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचे का? हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या इतर गोष्टी मान्य आहेत. पण ही भूमिका अजिबात मान्य नाही, असं ते म्हणाले आहेत.

तर पवारांच्यामागेही उभा राहीन

परवा मी पाच मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या संभाजीराजेंनी मांडल्या आहेत. जो कोणीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन करेल तो याच मागण्या पुढे रेटेल, असं सांगतानाच संघर्ष करून मराठा समाजाला न्याय मिळून देण्याची भूमिका शरद पवार किंवा अजित पवारांची असेल तर त्यांच्यामागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेल असं मी आधीच सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.

4 तारखेला याचिका दाखल करा

येत्या 4 जूनला मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 4 तारखेला पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर कोर्टाकडे तारीख मागावी लागेल. त्यावेळी कोर्ट तारीख देईल की नाही माहीत नाही. तसेच पुनर्विचार याचिका उशिरा दाखल केल्याबद्दल कोर्ट सरकारला जाबही विचारेल. त्यामुळे येत्या 4 तारखेला याचिका दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संभाजीराजेंच्या त्या वक्तव्यावर नो कमेंट्स

संभाजी छत्रपती यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचे आणि खासदारकीचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर बोलण्याची गरज नाही, असं पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागतिक लोकशाही निर्देशांकातील भारताची घसरण चिंताजनक: सचिन सावंत

News Desk

“एका महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणं हा पुरुषार्थ आहे का?”, जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना सवाल 

swarit

राज्यपाल पुन्हा चिडले, ‘या’ नेत्याला ‘दुसऱ्यांदा’ दिली शपथ

News Desk