नवी दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊन देखील, लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण वाढल्यामुळे चिंता वाढू लागली होती. तसेच, पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातोय की काय, अशी भिती देखील दिल्लीकरांना वाटू लागली होती. मात्र, दिल्लीत लॉकडाऊन लागू करणार नाही, असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. तर, महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत.
“हात जोडून विनंती करतो”
पुन्हा लॉकडाऊन जरी लागू केला जात नसला, तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना कळकळीचं आवाहन केलं आहे. “माझं दिल्लीकरांना हात जोडून आवाहन आहे की कृपया त्यांनी मास्क घालावेत”, असं केजरीवाल म्हणाले आहेत. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये दिवसभरात ३ हजार ५९४ नवे करोनाबाधित सापडले असून १४ रुग्णांचा Covid 19 मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आजपर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा आता ६ लाख ६८ हजार ८१४ इतका झाला आहे.
वाढत्या रुग्णसंख्येची मुख्यमंत्र्यांना चिंता
दरम्यान, दिल्लीमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांना यावेळी नमूद केलं. “दिल्लीमध्ये सध्या वाढत असलेली रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. पण सध्याची करोनाची लाट ही याआधीच्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची आहे. ऑक्टोबर २०२०पेक्षा सध्या आयसीयूमध्ये कमी रुग्ण आहेत. तेव्हा दिवसाला ४० मृत्यूंची नोंद होत होती, आता तो आकडा १० पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याऐवजी सरकार रुग्णालयांमधील आरोग्यसुविधा अधिक वाढवण्यावर आणि सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवण्यावर सरकारचा भर आहे”, असं देखील केजरीवाल यांनी सांगितलं आहे.
In the last few days, COVID19 cases in Delhi have been rising. 3,583 new cases have been reported in Delhi in the last 24 hours. This rise in cases now is the fourth wave. We are taking all possible measures, there is no need to worry: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/tP4Q8O2dJu
— ANI (@ANI) April 2, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.