HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणुक जाहीर

मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती शिक्षण समिती बेस्ट समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता आज अर्ज भरून निवडणूक घेण्यात येणार असून याकरिता शिवसेना आणि भाजप यांच्या मध्ये लढत पाहायला मिळण्यात आहे शिवसेनेकडून विद्यमान अध्यक्ष यशवंतराव जाधव यांना पुनश्च अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भाजप कडून स्थायी समिती अध्यक्षपदाचा करिता राजश्री शिरवाडकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

इतर समिती अध्यक्ष पदा करिता दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे

– शिवसेनेकडून सुधार समिती अध्यक्षपदा सदा परब ,शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी सौ संध्या दोशी, बेस्ट समिती अध्यक्ष पदाकरिता आशिष चेंबूरकर यांनी अर्ज दाखल केला आहे.

– भाजपाकडून शिरवाडकर, यादव, म्हात्रे, गंगाधरे यांना उमेदवारी

मुंबई पालिकेतील स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज (१ एप्रिल) होत आहे. या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून राजेश्री शिरवाडकर (स्थायी समिती), पंकज यादव (शिक्षण समिती), स्वप्ना म्हात्रे (सुधार समिती), प्रकाश गंगाधरे (बेस्ट) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणूकाही आता तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एससी-एसटी आरक्षण मुदत वाढीसाठी आज एकदिवसीय विशेष अधिवेशन

News Desk

भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे – जयंत पाटील

News Desk

दोन्ही राजे भिडले, गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

News Desk