मुंबई | संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. आता कुठे देशासह अनेक राज्यांत कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. देशातही दैनंदिन आकडा २ लाखांच्या खाली आला असून महाराष्ट्रातही २५ हजारांच्या आत हा आकडा आला आहे. तर रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
दरम्यान, मधल्या काळात महाराष्ट्रात झालेल्या रुग्ण वाढीमुळे ब्रेक द चेन अंतर्गत कडक नियम लागू करण्यात आले होते. हे नियम १ जूनपर्यंत लागू असणार आहेत. यानंतर हे निर्बंध वाढवावे अशी नेत्यांची मागणी होती. त्यामुळे १ जूननंतर काय होणार याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच देणार असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही म्हटलं होतं.
याच पार्श्वभूमिवर आज (३० मे) रात्री ८.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. पेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ते संवाद साधणार असून कडक निर्बंधांबद्दल, रुग्ण संख्येबद्दल ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नियमांमध्ये शिथिलता करणार का? लोकल, मेट्रो या संबंधी काय निर्णय घेणार? लसीकरणाबद्दल काय सागंणार या सगळ्याकडे जनतेचे लक्ष लागलं आहे. त्यामुळे आज रात्री ८ वाजता सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा सगळेचं जम लावून बसले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.