HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाची दूसरी लाट ओसरल्याचे चिन्ह, नव्या रुग्णांमध्ये झाली घट

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात 1 लाख 65 हजार 553 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 46 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे.

कालच्या दिवसात 3 हजार 460 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 460 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 76 हजार 309 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात २४ तासांत २० हजार २९५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर याच एका दिवसात नव्या ३१ हजार ९६४ कोरोना बाधित रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. राज्यातील अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख ७६ हजार ५७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

याचसोबत आणखी एक दिलासादायक बाब अशी कि राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ९३.४६% इतके झाले आहे. राज्यातील दुसरी लाट ओसरत असल्याचे हे चित्र दिलासादायक आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता खबरदारी राखणे अत्यंत आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोशल डिस्टन्स पाळले नाही, तर कोरोनाचा धोका वाढू शकतो

News Desk

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk

कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’चा प्रयत्न सुरू, राष्ट्रवादीने डागली मोदींवर तोफ

News Desk