HW News Marathi
महाराष्ट्र

ममता बॅनर्जी यांना आमच्या पक्षाचा पाठिंबा,ममताजींचे पत्र शरद पवार प्राप्त – नवाब मलिक

मुंबई | तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षाच्या अध्यक्षांना समर्थन देण्याबाबत पत्रव्यवहार केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनाही पत्र प्राप्त झाले असून आमच्या पक्षाचा ममताजींना पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

शरद पवारसाहेबांचा १ ते ३ एप्रिल असा पश्चिम बंगालचा दौरा होता परंतु त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जाता येणार नाही. मात्र पवारसाहेबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यास शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पश्चिम बंगालला जातील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी यांनी लिहिलं पत्र

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रातून विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी सुचवलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रात सात मुद्द्यांचा उल्लेख केला असून भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच देशातील जनतेसमोर आपण नवा पर्याय ठेवला पाहिजे असंही मत व्यक्त केलं आहे.

“मला वाटतं ती वेळ आली आहे जेव्हा भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. टीएमसीची प्रमुख म्हणून मी मनापासून तुमच्यासोबत आणि समविचारी इकर पक्षांसोबत या लढ्यात आहे,” असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.ममता बॅनर्जींनी हे पत्र सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच डीएमकेचे स्टॅलिन, वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी, बीजेडी प्रमुख नवीन पटनाईक, तेलंगण राष्ट्रसमिती प्रमुख चंद्रशेखर राव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पाठवलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna

एससी-एसटीच्या आरक्षणाला पुढील १० वर्षांसाठी मुदतवाढ, विधेयक एकमताने संमत

News Desk

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

News Desk