HW News Marathi
महाराष्ट्र

वर्षभरात कोकणाला तिसरा फटका, आतातरी सरकारने मदत द्यावी

मुंबई | कोकणात पावसाने धुमाकुळ घातला आहे. पुरस्थिती निर्माण झाली असून हवामानखात्याने आणखी २ दिवस कोकणाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. गेल्या वर्षभरात कोकणाला तिसऱ्यांदा नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे. त्यामुळे आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक भागांमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोकणातील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षभरात कोकणाला बसलेला हा तिसरा फटका आहे. यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळावेळी राज्य सरकारने कोकणाला मदत केली नाही. किमान आतातरी मदत द्यावी. तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवाव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

सिंधुदुर्गात सकाळपासून मुसळधार पाऊस लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.सकाळी सकाळीच संततधार असणाऱ्या पावसाने नंतर जोरदार बॅटिंग करत जिल्ह्याला झोडपून काढले.जिल्ह्यातील नदी,नाले,ओहोळ यांना पूर आला असून यावरून जाणारे जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्यामुळे बंद झाले आहेत. सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून काही भागात शेती ही पाण्याखाली गेली आहे.नदी कडील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला असून अतिवृष्टीमुळे झाडे ही कोसळून पडली आहेत.

कणकवली व वैभववाडी तालुक्यात अतीमुसळधार पाऊस लागला असून काही घरे आणि गोठ्यांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बसस्थानकाला ही पाण्याचा वेढा पडला आहे.गेले तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता. मात्र आज मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आहे.या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गवासीयांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.तूर्तास पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. पण आणखी असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर याहून ही भयंकर परिस्थिती येऊ शकते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतक-यांच्या जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा! – विजय वडेट्टीवार

Aprna

राज, उद्धव यांची पुढची पिढी एकत्र

News Desk

बुडण्यापूर्वी त्यांनी केले फेसबूक लाइव्ह

News Desk