HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिक पोलिसांत तक्रार, सेनेचे मंत्री अनिल परब यांनी केला खुलासा

मुंबई | ठाकरे सरकारमधील अनेक नेते गेले अनेक दिवस अडचणीत असल्याचं दिसून आलं आहे. अशात राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि काही परिवहन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी तब्बल तक्रार परिवहन विभागातील एका निलंबित अधिकाऱ्याने नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली असून तेथील पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) यांना दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात आरोपाचे सत्र सुरूच आहे. परिवहन मंत्री अनिल परब (पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. नाशिकमध्ये निलंबित अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, माझ्या आणि इतर 5 अधिकाऱ्यांविरोधातील ही तक्रार पूर्णतः निराधार व खोटी आहे, असा दावा अनिल परब यांनी केला आहे.

नाशिकमधील पंचवटी पोलिसात अनिल परब यांच्याविरोधात गजेंद्र पाटील यांनी तक्रार केली आहे. पदोन्नतीमध्ये गैरव्यहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे क्राईम ब्रांचला दिले आहे. तक्रारदार गजेंद्र पाटील यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.

अनिल परब यांचा ट्विट करत खुलासा

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एकापाठोपाठ ट्वीट करत आपल्यावर झालेल्या आरोप खोडून काढले आहे. ‘निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसंच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे,

विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे, अशी टीका परब यांनी केली आहे.

 

‘मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे, असंही परब म्हणाले आहेत.

काय आहे प्रकार?

नाशिक येथे मोटार वाहन निरिक्षक असलेले गजेंद्र तानाजी पाटील यांनी १६ मे रोजी ही तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात दिली. त्यावर पोलीस आयुक्त पांडेय यांनी पाच दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश २७ मे रोजी दिले. तक्रारकर्ते पाटील हे चौकशीसाठी सहकार्य करीत नसले तरी तक्रारीतील मजकूर पाहता त्यात अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत.

त्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष करणे न्यायोचित होणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी पोलीस महासंचालकांच्या २०१४ मधील एका आदेशाचा आधार घेत हे स्पष्ट केले आहे, की गजेंद्र पाटील यांची तक्रार ही तीन महिन्यांपूर्वीच्या प्रकरणातील असल्याने गुन्हा दाखल न करता आधी चौकशी केली जाईल.

या तक्रारीबाबत पंचवटी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांनी पोलीस आयुक्तांना २४ मे रोजी कळविले. तक्रारीचे स्वरुप राज्यस्तरीय आहे आणि त्यात परिवहन मंत्री व काही अधिकाऱ्यांविरुद्ध आरोप केलेले आहेत, त्यामुळे आपण शहर पोलीस आयुक्तांना कळवित असल्याची भूमिका पंचवटी ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांनी घेतली.

तक्रारीमध्ये काय लिहिले आहे?

उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे परिवहन विभागाच्या राज्यभरातील बदल्या कशा मॅनेज करतात, त्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत याचा तपशील तक्रारीत देण्यात आला असून परिवहन मंत्री परब हे त्यांना संरक्षण देतात, असे तक्रारीत म्हटले आहे. खरमाटे यांनी कोणत्या अधिकाऱ्यांकडून किती रक्कम बदल्या/पदोन्नतीसाठी घेतली याचे उल्लेख तक्रारीत आहेत. उपसचिव प्रकाश साबळे यांच्यावरही आरोप आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती निवडणूक – २०२२ साठी जय्यत तयारी; निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक

Aprna

राज्यात काहीही नवे घडले की माझ्याच नावाची चर्चा !

News Desk

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका! – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Aprna