HW News Marathi
महाराष्ट्र

स्वतःला वाचवण्यासाठी चौक्सीने ॲटिग्वा देशाचे राष्ट्रीयत्व स्वीकारले -उज्वल निकम

जळगांव | पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमेनिका या देशात अटक करण्यात आली आहे. आता भारताने राजकीय मुत्सद्देगिरी वापरून चोक्सीची हकालपट्टी करण्यास अँटिग्वा देशाला भाग पाडावे, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. अ‌ॅड. उज्ज्वल निकम हे जळगावात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपले मत मांडले

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा ठगसेन मेहुल चोकसी याने कातडी बचावासाठी अँटिग्वा देशाचे राष्ट्रीयत्व घेतले. सीबीआयची इंटरपोल नोटीस जारी होताच तो डॉमेनिका देशात पळून गेला. त्यावेळी अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी मेहुल चोकसीला डॉमेनिकातच अडकवून ठेवले जाईल. तेथून हद्दपार केल्यावर त्याला भारताकडे सुपूर्द केले जाईल, असे जाहीर केले होते. पण ही कारवाई पूर्णपणे डॉमेनिका देशावर अवलंबून आहे. माझ्या मते डॉमेनिका देश मेहुल चोकशीला अँटिग्वात हद्दपार करेल. मग भारताला गुन्हेगार हस्तांतर प्रक्रिया करावी लागेल, असे अ‌ॅड. निकम यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकशाही पूर्णपणे नष्ट केली…

swarit

मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, वारीचा निर्णय सरकारने विचार करूनच घेतला

News Desk

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध – छगन भुजबळ

News Desk