HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री, थेट उद्धव ठाकरेंनाही केले ‘हे’ आवाहन

मुंबई | देशातील प्रत्येक निवडणूक लढवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे मानणाऱ्या अभिजित बिचुकले यांनी पुन्हा एखदा उमेदवारी अर्ज भरला आहे. आता पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यांच्या गळ्याच विजयाची माळ पडलेली नाही. तरीदेखील अभिजित बिचुकले हे चिकाटीने मोठमोठ्या निवडणुका लढवत असतात.

आताही बिचुकले यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार आहे. ते लवकरच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली होती. मात्र, त्यावेळी मतदानाला गेलेल्या बिचुकले यांचे नावच मतदार यादीत सापडले नव्हते. त्यामुळे अभिजित बिचुकले यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यापूर्वी 2019 मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता.

उद्धव ठाकरेंना आवाहन

निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी ते एकटेच आले होते. शंका आल्यानं पोलिसांनी त्यांना अडवले असता मी उमेदवार असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. उद्धवदादा तुम्ही कारवाई करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले आहेत. बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी निवडणुकीच्या रिंगणात अचानक घेतलेल्या उडीमुळं रंगत वाढली आहे.

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघी १५० मतं मिळाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काय म्हणते ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर घेऊन उभी राहणारी तरुणी…

News Desk

ST महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी, पुन:स्थितीकरणासाठी वित्तमंत्री अजित पवारांच्या निर्देशानुसार ३९ कोटी रुपये वितरित

Aprna

महापौरांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबतचा तपास लवकरात लवकर पूर्ण करणार! – गृहमंत्री 

Aprna