HW News Marathi
महाराष्ट्र

“संजय राऊत मोठे नेते आहेत पण…” 

मुंबई | संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते संपादकही आहेत. महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, तरीही संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहील. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. गेल्या अनेक दिवसांपासून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात या मुद्यावरुन शाब्दिक वाद सुरु होते.

ते आज (३० मार्च) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या कथित भेटीसंदर्भातही भाष्य केले. जी भेट झालीच नाही त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. अशाप्रकारचा संभ्रम निर्माण करुन उपयोग नाही. भाजपने काहीतरी अफवा पसरवू नयेत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का, नाना पटोलेंनी फटकारले

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले..” , खडसे -महाजन वाद सुरू

News Desk

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

Aprna

पंढरपूर पाठोपाठ देगलूरमध्ये क्रांती होणार, सदाभाऊ खोतांचा दावा!

News Desk