HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

मुंबई | माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ७४ वर्षाचे होते, मागील काही दिवसांपासून धनंजय जाधव यांना ह्दयासंबंधित आजाराचा त्रास होता, धनंजय जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी साताऱ्यातील पुसेगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

१९७३ च्या बॅचमधील धनंजय जाधव हे आयपीएस अधिकारी होते, १९९२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पोलीस पदक प्रदान करून गौरव करण्यात आला होता, अनेक पुरस्कारांनी धनंजय जाधव यांना गौरविण्यात आलं होतं, २००७ मध्ये धनंजय जाधव यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली होती, त्यानंतर २००२ मध्ये जाधव यांना पदोन्नती देत अप्पर पोलीस महासंचालक म्हणून महामार्ग सुरक्षा पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी दिली होती.

धनंजय जाधव यांची कारकीर्द

धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ मध्ये पुसेगावात झाला. प्राथमिक शिक्षण मूळगावीच, तर माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एमएससी ही पदव्युत्तर पदवी घेतली. आधी ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले धनंजय जाधव यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन १९७३ मध्ये भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आधी धुळे, नंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलं.

मुंबई पोलीस आयुक्तपदाचीही धुरा

काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले. तर २००७ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल १९९२ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक प्रदान करुन जाधवांचा गौरव केला होता. त्याच वर्षी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन धनंजय जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

News Desk

हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीने कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा

swarit

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधून सुटका, आरोपी अटक

News Desk