HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर परिणामी कमी आघात 

मुंबई | कोरोनाच्या पहिल्या लाटेइतक्या भारताच्या अर्थव्यवस्थेवरील दुसऱ्या लाटेने केलेले आघात कमी असले तरी येणाऱ्या काळासंबंधी निर्माण झालेली अनिश्चितता कायम आहे, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थवृद्धीबाबतच्या अंदाजाचा फेरविचार केला जावा आणि मध्यवर्ती बँकेकडून अंदाजित १०.५ टक्क्यांच्या अंदाजाशी मिळतेजुळतेच अनुमान पुढे येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

रिझर्व्ह बँकेने २०२०-२०२१ सालासाठी वार्षिक अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला. मागील वर्षात अर्थव्यवस्थेला बसलेल्या दणक्याचे वण अजून दिसत आहे, मात्र २०२१-२२ हे नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असतानाच, उफाळलेल्या दुसऱ्या लाटेच्या बरोबरीने सुरू झालेल्या लसीकरणाने मदत केली असं देखील अहवालात म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर १०.५ टक्क्यांवर राहिल, असे भाकित केले आहे. तथापि दुसऱ्या लाटेच्या आघातानंतर आज बहुतांश अर्थविश्लेषकांकडून अंदाजात फेरबदल केला गेला आणि सुधारीत अंदाज हे रिझर्व्ह बँकेच्या अनुमानाशी साधर्म्य सांगणारे आहेत. इतर सर्व संस्था व विश्लेषकांनी पूर्वीचे अंदाज सुधारून, दोन अंकी दराने वाढ शक्य नसल्याचे सुधारीत भाकिते केली आहेत, तर रिझर्व्ह बँकेचे पूर्वानुमानही प्राप्त परिस्थितीमुळे बदलले आहे काय, हे मात्र अहवालाने स्पष्ट केलेले नाही.

सध्याच्या साथीने सर्वाधिक जोखीम ही नजीकच्या काळासंबंधी अंदाजाला निर्माण केली आहे, याची कबुली या अहवालाने दिली आहे. सरकारकडून भांडवली खर्चात वाढ, उत्पादन क्षमतांचा वाढता वापर आणि भांडवली वस्तूंची आयात उलाढालीत वाढ झाली तर दृष्टिकोन वाढक्षम बनेल, अशी पुस्तीही अहवालाने जोडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत २४,८५० नवे रुग्ण

News Desk

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

News Desk

मी मुख्यमंत्र्यांकडे ३ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी करणार ! 

News Desk