HW News Marathi
महाराष्ट्र

लॅाकडाऊनसंबंधी आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला !

मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची तयारी राज्य सरकारने केल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे निर्देश बैठकीत दिले आहेत. राज्यात सातत्याने वाढणारे करोना रुग्ण आणि मृतांचा आकडा या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, लॅाकडाऊनच्या शक्यतेच्या मुद्द्यावरून आता उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परखड बोल सुनावले आहेत.राज्यात पुन्हा लॅाकडाऊन करण्यावर त्यांनी लॅाकडाऊन न करण्याचा सल्ला महिंद्रांनी दिला आहे.

आनंद महिंद्रा यांनी काय ट्विट केले आहे ?

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे की,”उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”.

मुख्यमंत्र्यांचे बैठकीत लॅाकडाऊनचे निर्देश

आरोग्य विभागातील आणि कोविड टास्क फोर्समधील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन संदर्भात सूचना केल्या आहेत. “जर नागरिकांकडून सातत्याने कोविड संदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केलं जात असेल, तर लॉकडाऊनसारख्याच निर्बंधांची तयारी सुरू करा”, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांनी काय करायला पाहिजे, हे सांगणे लष्कराचे काम नाही !

News Desk

अकरावी प्रवेशासाठी इन हाऊस कोटा आता १० टक्के

News Desk

‘त्या’ विधानावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण….!

News Desk