HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार संभाजीराजे उद्या घेणार शरद पवारांची भेट ! मोदींनी टाळली होती भेट

औरंगाबाद | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवल्यानंतर ते पुन्हा कसं मिळवायचं, यावर राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीच्याही बैठका सुरू आहे. मात्र, त्याचवेळी मराठी आरक्षणाचा मुद्दा सुरुवातीपासून लावून धरणारे खासदार संभाजीराजे हे देखील महाराष्ट्रभर दौरे करत आहेत.यासंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, २७ मे रोजी संभाजीराजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

मुंबईत शरद पवारांची भेट घेणार

शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या बंगल्यावर सकाळी ९.३० वाजता ही भेट होणार आहे. गेले अनेक दिवस राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हेलखावे खात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार संभाजीराजे यांना भेटण्याची वेळ देत नाही आहेत. यावरुन एकीकडे राजकारण पेटलेले असताना आता संभाजीराजे थेट शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

गेल्या ३ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या विषयी मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक, कार्यकर्ते, कायदेतज्ञांच्या भेटी घेत आहेत. या दौऱ्याला अभूतपुर्व प्रतिसाद लाभत आहे.बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बैठका वाढत आहे. यामुळे दौरा लांबला आहे. अजून लोकांच्या भेटी घेणे आवश्यक असल्याने २७ तारखेला घेण्यात येणार पत्रकार परिषद २८ तारखेला मुंबईत घेणार आहे. यावेळी मराठी समाजाच्या भावना मी आपल्या सर्वांसमोर मांडणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

२८ मे रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेणार

“उपसमितीच्या बैठकीत काय झालं, त्याची मला कल्पना नाही. पण आम्ही आमच्या बाजूने काम सुरू केलं आहे. राज्यातले सर्व समन्वयक, कायदेतज्ज्ञ, अभ्यासक यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे की या परिस्थितीतून आपण बाहेर कसं पडायचं? सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द झाल्याचं स्पष्ट केलं आहे. यापुढे नेमकं काय आहे? ही केंद्राची जबाबदारी आहे की राज्याची जबाबदारी आहे? १०२ व्या घटनादुरुस्तीमध्ये काय सिद्ध होणार आहे? या सगळ्याचा अभ्यास सुरू आहे. २८ तारखेला पूर्ण समाजाच्या वतीने आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, असं ते म्हणाले आहेत.

मोदींना ४ वेळा भेटीसाठी पत्र लिहिलं

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर भुजबळांना जामीन मंजूर

swarit

अनेकांना वाटत होते, मी निवृत्त होईल पण तसे घडले नाही !

swarit

पुन्हा एकदा अजित पवार-देवेंद्र फडणवीस नव्या वर्षात एकाच मंचावर येणार!

News Desk