HW News Marathi
महाराष्ट्र

राजभवनातून फाईल गहाळ, शिवसैनिकांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

पुणे | राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने तिन्ही पक्षातील १२ सदस्यांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. पण, राज्यपालांकडून अनेक महिने उलटून गेले असूनही अद्याप या नावांना मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे.

तर दुसरीकडे एका माहिती अधिकारातून ही फाईलच गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकारण अजून पेटलं आहे. फाईल गहाळ झाल्याच्या प्रकरणात पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. त्यात तपास करण्याबद्दल सल्लाही द्यायला शिवसैनिक विसरले नाही. तर दुसरीकडे राजभवनात ही यादी सुरक्षित असल्याचंही म्हटलं जात आहे. पण या माहिती अधिकारातून जे समोर आलं आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होणार असे दिसून येत आहे.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राजभवनाकडे विचारणा केली आणि राज्यातील जुन्याच विषयाला पुन्हा नवी फोडणी मिळाली. लगेच शिवसेनेनं त्यावरून राज्यपालांवर निशाणा साधला. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच राजभवनातून फाईल गहाळ झाली असल्याची माहिती समोर आली.

एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजभवनाने उत्तरं देताना हे सांगितलं. फाईल गहाळ झाल्याचं ऐकल्यानंतर शिवसेनेनं राजभवन आणि भाजपाचा समाचारच घेतला. त्यानंतर फाईल सापडली असल्याचं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, फाईल गहाळ झाल्याच्या वृत्तानंतर पुण्यातील शिवसैनिकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्याचबरोबर शोध घेण्यासाठी सल्लाही दिला. विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या नावाची फाईल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र ती फाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

आता राजभवन येथे कोण कोण आले होते. हे राजभवन परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घ्यावा, जेणेकरून फाईलचा शोध लागण्यास मदत होईल, असं निवेदन शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, आनंद दवे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले. “आम्ही करोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत जाणे शक्य नसल्याने, आम्ही पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन दिले असून, तपास यंत्रणेच्याद्वारे त्या फाईलचा शोध घ्यावा,” अशी मागणी असल्याचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे बोलताना सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता बिचूकलेंना चक्क विधान परिषदेवर जाण्याची इच्छा, राज्यपालांना पाठवले पत्र

News Desk

भाजपच्या उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वापरले अपशब्द

News Desk

ज्याच्याकडे पैसा त्याच्या मुलाला जामीन मिळतो; आर्यन खान प्रकरणी औवेसींची प्रतिक्रिया

News Desk