HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC परिक्षा रद्द करु नका, रोहित पवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

पुणे | गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. MPSC च्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर देत या निर्णयाचा निषेध केला आहे.यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSCची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!, असे ट्विट करत रोहित पवारांनी विनंतीही केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी टीका केली आहे. “एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? गेले अनेक महिने मुलांनी जी तयारी केली आहे त्या विद्यार्थअयांना अडचणीत टाकणारा हा निर्णय आहे. ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे. मुलं आज बेरोजगारीने बेजार असताना अनेक दिवस आपल्या गावापासून, घरापासून दूर राहून MPSC, UPSC चा अभ्यास केला आहे. आणि या निर्णयाचा जाहीर निषेध करतो,” असे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. रस्त्यावर झोपून आंदोलन केले जात आहे. ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेणा तलावात दहा जण बुडाले

News Desk

कोरोना व्हायरसमुळे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार

swarit

गोपीचंद पडळकर यांचा ‘तो’ प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला – गृहमंत्री

News Desk