HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांचे केरळमध्ये काँग्रेसला ‘खिंडार’, केरळची महिला नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश

केरळ | नुकत्याच ५ राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यातील एक म्हणजे केरळ विधानसभा निवडणुक.केरळमध्ये झालेल्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकिट न मिळाल्याने मुंडन करणाऱ्या राज्य महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा लतिका सुभाष या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे केरळ प्रदेशाध्यक्ष पी सी चाको यांच्यासोबत लतिका यांची चर्चा झाली असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस कार्य़ समितीचे सदस्य असलेले चाकोदेखील राष्ट्रवादीमध्ये आले होते. चाको यांनी 10 मार्चला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी मुंबईत येत निवडणुकीचा प्रचार सुरु असताना शरद पवारांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीवरून गटबाजी केल्याचा आरोप चाको यांनी केला होता.

काय म्हणाल्या लतिका सुभाष?

राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, जो काँग्रेसच्या परंपरेशी जोडलेला आहे. तसेच चाकोंसोबत चांगले संबंध आहेत. यामुळे मी चाकोंसोबत चर्चा केली. लवकरच माझ्या निर्णय़ाची घोषणा केली जाणार आहे, असे लतिका सुभाष यांनी सांगितले आहे.

लतिका सुभाष यांना त्यांच्या एकूण अनुभवावरून पक्षात एक मोठी जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे. सुभाष या 6 एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत एत्तुमानूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या होत्या. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपण दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे देखील म्हटले होते. मात्र, आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे दिसत असून हा पक्षप्रवेश कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांनंतर खासदार संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट !

News Desk

सीबीआय संचालकांना रातोरात का हटवले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

News Desk

प. बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींना बसणार मोठा धक्का

News Desk