HW News Marathi
Covid-19

चिंताजनक! राज्यात गेल्या २४ तासांत २८ हजारांच्या पुढे नवे रूग्ण आढळले

मुंबई | राज्यात काल (२३मार्च) २८,६९९ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर, १३,१६५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण २२,४७,४९५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २,३०,६४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८८.७३% झाले आहे.

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगढ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमधे दररोज नवीन रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात एकूण नोंद झालेल्या नवीन प्रकरणांपैकी ८०.९०% इतके रुग्ण या सहा राज्यातलेच आहेत.

फेब्रुवारीच्या मध्यामधे भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येने तळ गाठला होता. मात्र त्यानंतर एकूण सक्रीय रुग्णसंख्या वाढतच आहे. देशातील एकूण सक्रीय प्रकरणांपैकी ७५.१५% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यातले आहेत. देशातील एकूण सक्रीय प्रकरणांपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा ६२.७१% आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार २९१ रुग्णांची कोरोनावर मात!

News Desk

देशात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ

News Desk

मराठा आरक्षणासाठी मोदींना साकडे घालणार ! रामदास आठवलेंचा निर्धार

News Desk