HW News Marathi
Covid-19

देशात कोरोना रूग्ण संख्या घटली!

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर देशातील दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येनं साडेचार लाखांची उच्चांकी संख्या नोंदवली गेली. आता हळहळू रुग्णसंख्या घसरत असल्याचं दिसून येत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ३० लाखांच्या खाली आली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत २ लाख ५७ हजार २९९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे तीन लाख ५७ हजार ६३० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत देशात ४ हजार १९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ९५ हजार ५२५ वर पोहोचली आहे.

 

राज्यात काल (२१ मे) दिवसभरात २९ हजार ६४४ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ४४ हजार ४९३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात ५५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८६ हजार ६१८ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात, मग दिल्लीत १५ एकरांच्या घराचा उपद्व्याप का ?”

News Desk

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून ‘शिक्षण मंत्रालय’ असे नवे नामकरण

News Desk

महाराष्ट्राला रणांगण बनवण्याचा भाजपचा प्रयत्न !

News Desk