HW News Marathi
महाराष्ट्र

आपलं सरकार असतानाही जर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा… काँग्रेसचा सल्ला

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने काल.(२२ मार्च) एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. दुरदृश्य प्रणालीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अन्याय होत असेल तर बेधडक आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे.

आपलं सरकार असतानाही अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांवर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा. अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करा. कोणताही अन्याय सहन करू नका, असा सल्ला अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.

आपले सरकार असले तरी अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय समाजावर जर अन्याय होत असेल किंवा अपेक्षित न्याय मिळत नसेल तर आपण रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करायला हवे. प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांनी पदोन्नतीतील आरक्षण, नोकऱ्यातील अनुशेष असो की अन्य विषय एससी-एसटी आणि मागासांना मिळू नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.

मराठा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो आणि त्याचे पडसाद मंत्रिमंडळात उमटतात. मात्र एकेकाळी आपल्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरणाऱ्या वंचित-शोषित समाजाने आता रस्त्यावर उतरून लढणे बंद केले आहे. रस्त्यावर उतरून जोवर प्रत्येक जिल्ह्यात लढा उभारणार नाही, तोवर आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने प्रत्येक गावात आपली शाखा उभी करावी आणि गाव पातळीवर एक अध्यक्ष नेमून संघटना भक्कम करावी, राज्यातील ४४ हजार गावांमध्ये अनुसूचित जाती विभागाचा किमान एक कार्यकर्ता हवा. प्रभारी, पदाधिकारी यांनी प्रत्येक गावात एससी-एसटींच्या वस्तीत मुक्काम करावा, अनुसूचित जाती-जमाती समुदायातील सदस्यासोबत सहभोजनाचा आनंद घ्यावा.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

या बैठकीत बोलताना विधिमंडळाच्या अनुसूचित जाती विषयक समितीच्या प्रमुख आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळ समितीत ही पदोन्नतीतील आरक्षणावर चर्चा झाल्याचे सांगितले. या विषयावर तसेच अनुसूचित जातीच्या निधी विषयक कायदा करण्यासाठी राऊत यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी, अशी सूचना शिंदे यांनी केली. ही सूचना लगेच मान्य करीत या संदर्भात एक पत्र देण्याची विनंती राऊत यांनी शिंदे यांना केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरपीआयला महाराष्ट्रात उमेदवार उभे करता येत नाही .. विलास गरुड 

News Desk

समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचा संबंध काय?- नवाब मलिक

News Desk

सायंकाळी परबांना 100 कोटी वसुलीची ईडी नोटीस, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk