HW News Marathi
Covid-19

कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | कोरोनावरील उपचारांमध्ये महत्वाची मानल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपीसंदर्भात केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून करोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता.

दरम्यान केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.

आतापर्यंत करोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या ७ दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. दरम्यान टास्क फोर्सने आता प्लाझ्मा थेरपीला उपचारांमधून वगळलं आहे

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर करोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थेरपी कोरोनाविरोधातील उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं. यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठीही आवाहन केलं जात होतं. मात्र अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी परिमाणकारक नसल्याचं समोर आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अन्यथा गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल”, सेनेचा केंद्राला गंभीर इशारा

News Desk

यवतमाळमध्ये चिंता वाढली ! जिल्हाधिकारी ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

News Desk

राज्यात आज ११,१११ नवे रुग्ण आढळले तर ८८३७ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk