HW News Marathi
देश / विदेश

टीएमसीच्या मंत्री, आमदारांना अटक, ममतादीदी म्हणाल्या, मलाही अटक करा

कोलकाता | नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने आज टीएमसीच्या मंत्री आणि आमदारांच्या घरी छापेमारी केली. त्यानंतर एका मंत्र्यासह दोन आमदार आणि एका नेत्याला अशा चौघा जणांना अटक केली. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रचंड खवळल्या आहेत. आमच्या नेत्या आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हिंमत असेल तर मलाही अटक करा, असं आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.

मंत्री, आमदारांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी यांनी थेट सीबीआयलाच आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा, असं आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. टीएमसीचे नेते आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आले आहे. त्यामुळे मलाही अटक करा, असं त्या म्हणाल्या आहेत. नेत्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालय असलेल्या निजाम पॅलेसमध्ये पोहोचल्या आहेत.

दरम्यान, आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

काय आहे नारदा घोटाळा?

पश्चिम बंगालमध्ये 2016च्या निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आले होते. 2014मध्ये हे टेप रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये टीएमसीचे मंत्री आणि आमदार एका काल्पनिक कंपनीकडून कॅश घेताना दिसत होते. हे स्टिंग ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केलं होतं. कोलकाता उच्च न्यायालयाने 2017मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये या चार नेत्यांचीच नावे नव्हती, तर भाजपमध्ये सामिल झालेल्या अनेक नेत्यांचीही नावे होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस भरतीत आलेल्या उमेदवारांना घृणास्पद वागणूक

swarit

राज्यात सध्या २ मुख्यमंत्री, अजित पवारांना अपयशी ठरविण्याचे प्रयत्न सुरु !

News Desk

करणी सेनेचा उच्छाद, अनेक ठिकाणी जाळपोळ

News Desk