HW News Marathi
Covid-19

विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांचा वैज्ञानिक सल्लागार ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली | देशात कोरोनाविरोधात लढा सुरु असतानाच, सरकारच्या तयारीला मोठा झटका बसला आहे. ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोविड जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्ये या सल्लागार ग्रुपची स्थापना केली होती.

कोरोना संकटात डॉ. शाहिद जमील यांना केंद्र सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. SARS-CoV-2 विषाणूच्या जीनोम स्ट्रक्चरची ओळख पटवण्यासाठी केंद्र सरकारने वैज्ञानिक सल्लागार ग्रुप बनवला होता, शाहिद जमील त्या ग्रुपचे अध्यक्ष होते. काल (१६ मे) त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.

डॉ. शाहिद जमील यांनी ग्रुपचं अध्यक्षपद का सोडलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र काही वृत्तानुसार कोरोनाबाबत सरकारच्या धोरण आणि तयारीवर ते समाधानी नव्हते. अशोका विद्यापीठात त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक असणाऱ्या शाहिद जमील यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता, ज्यात त्यांनी सरकारच्या तयारीवर टीका करत वैज्ञानिकांचा सल्ला ऐकत नसल्याचा आरोप केला होता. “मोदी सरकारने वैज्ञानिकाचं म्हणणं ऐकावं आणि धोरण बनवण्यासाठी हट्टी वृत्ती सोडा,” असा सल्ला या लेखात त्यांनी दिला होता.

शाहिद जमील यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटकडे लक्ष वेधत असं लिहिलं होतं की, “एक वायरोलॉजिस्ट म्हणून मी मागील वर्षापासून कोरोना आणि लसीकरणावर नजर ठेवून आहे. कोरोनाचे अनेक व्हेरिएंट पसरत असून ते कोरोनाच्या पुढच्या लाटेसाठी जबाबदार ठरु शकतात, असं माझं मत आहे. भारतात कोविड-19 ची दुसऱ्या लाटेचा वेग मंदावल्याचं दिसत आहे, परंतु ही लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त काळ राहिल आणि जुलैपर्यंत टिकेल. कोविड संसर्गाची दुसरी लाट पिकवर पोहोचली असल्याचं म्हणणं घाईचं ठरेल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १ लाखांच्या पुढे

News Desk

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला

News Desk

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

News Desk