HW News Marathi
देश / विदेश

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॉम्बहल्ला १५ ठिकाणी बॉम्बहल्ला

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकूण ३ लोकं जखमी झाली असून यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. भाजप खासदार अर्जून सिंग यांच्या घरापासून काही अंतरावरच हा हल्ला करण्यात आला आहे. एकूण १५ ठिकाणी बॉम्बहल्ला करण्यात आला असून यावेळी हल्लेखोरांना ठिकठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीची तोडफोड देखील केली आहे.
घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र यावेळी त्यांना स्थानिकांच्या संतप्त आंदोलनाचा सामना करावा लागला होता. पोलिसांच्या उपस्थितीतच एक बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे आणि यामागे काय हेतू आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही आहे.
अर्जून सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही गेल्या १० ते १२ दिवसांपासून पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असूनही लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पावलं उचलली गेली नाहीत. आम्ही निवडणूक आयोगालाही राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंबंधी सांगितलं असून यादरम्यादनच बॉम्बहल्ल्याची घटना घडली आहे. खऱं तर सत्ताधाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस कोणतीही कारवाई करत नाही आहेत”.
“जर पोलीस काही कारवाई करु शकत नसतील तर मग हा खेळ खूपच धोकादायक होईल आणि तृणमूल काँग्रेस व गुंड संपतील,” असं ते म्हणाले आहेत. लोकांनी मतदान करु नये यासाठी भीती निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 |  मिशन पोषण 2.0 ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा

News Desk

कर्जमाफीच्या बदल्यात ‘सेक्स’

News Desk

Republic Day | यंदा महाराष्ट्राच्या वतीने ‘छोडो भारत’ चळवळ दर्शविणारा चित्ररथ

News Desk