HW News Marathi
Covid-19

राज्याची चिंताजनक स्थिती ! नव्या कोरोनाबाधितांचा आजचा आकडा थेट २३ हजारांच्या पार

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी स्थिती दिवसेंदिवस अत्यंत चिंताजनक होत असून राज्य सरकारपुढे मोठे आव्हान आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१७ मार्च) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल 23 हजार 179 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गंभीर म्हणजे हा आकडा मंगळवारच्या (१६ मार्च) तुलनेत अचानक थेट ६ हजारांच्या फरकाने वाढला आहे. मंगळवारी राज्यात 17 हजार ८६४ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामुळे, राज्य सरकार आणि प्रशासन आणखी सतर्क आणि कडक होणार हे निश्चित.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेली माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत नवीन 9 हजार 138 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अर्थात कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे, राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा एकूण 21 लाख 63 हजार 391 इतका झाला आहे. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण 1 लाख 52 हजार 760 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.26% झाले आहे. दरम्यान, फक्त २४ तासांमध्ये कमालीचा वाढलेला कोरोनाबाधितांचा आकडा राज्यासाठी सूचक इशारा ठरतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात सलग तिसऱ्यांदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, आज ५,४९३ रुग्णांची पडली भर

News Desk

आता सांगलीत कोरोना पाय पसरवणार नाही , जयंत पाटलांना विश्वास !

Arati More

राज्यात आज ४ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk