HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यात शिवसेनेच्या मंत्र्याचा हस्तक्षेप?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारात शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच ही गोष्ट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मुद्दा मांडल्याचे समजत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगलेले पाहायला मिळाले होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देखील दिली होती. त्यामुळे महाविकासआघाडीच्या गोटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आता अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव समोर आल्याने अनिल देशमुख यांच्याकडून पुन्हा एकदा अनिल परब यांच्या गृहखात्यातील हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंग यांची ठाकरे सरकारविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात धाव

News Desk

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र….!

News Desk

ठाकरे गटाला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

Aprna