पंढरपूर | राष्ट्रवादीचे पंढरपूरचे आमदार दिवंगत भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरची जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर अखेर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल ला मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल २ मे ला लागणार आहे.30 मार्च ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे तर 31 मार्च ला नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल.
राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ?
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याविषयी अद्याप संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादीने उमेदवाराची घोषणा केलेली नसल्याने पंढरपूरची निवडणूक चुरशीची होत चालली आहे. यामुळे चुरशीच्या होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी काही दिवसांतच राष्ट्रवादी आणि अन्य पक्ष आपले उमेदवार घोषित करतील.
राष्ट्रवादीकडुन ‘ही’ नावे चर्चेत
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी अनेक नावे सध्या चर्चेत आहेत. युटोपीय साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, दामाजी सहकारी साखर करखान्याचे चेअरमन व आवताडे समुहाचे सर्वेसर्वा समाधान आवताडे ,शिवसेना महिला नेत्या शैला ताई गोडसे, डी.व्ही.पी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे नाव मागील काळात व आताही चर्चेचे केंद्र बनलेलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.