HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उच्च न्यायालयात दाखल, कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई | राज्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (१४ मे) मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्याचे वृत्त येत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील होते अशी माहिती मिळते. राज्यात सध्या अनेक मुद्दे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. राज्यातील कोरोनास्थितीपासून ते मराठा आरक्षणापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सध्या राज्यात अनेक घडामोडी सुरु आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक उच्च न्यायालयात दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्धव ठाकरे सकाळी ११.३० च्या दरम्यान उच्च न्यायालयात दाखल झाल्याची माहिती मिळते. प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीश हे मुख्यमंत्र्यांची किंवा कोणत्याही मंत्र्यांची भेट घेऊ शकत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री स्वतः जाऊन मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊ शकतात. याचनुसार हि भेट झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल अर्ध्या तासापासून मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीशांमध्ये चर्चा झाल्याचे समजते मात्र त्यामागचे कारण अस्पष्ट आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लस घेतली म्हणजे कोरोनामुक्त झालो अशा आविर्भावात कोणी वागू नये – राजेश टोपे 

News Desk

“धार्मिक अधिकारापेक्षा जगण्याचा अधिकार सर्वोच्च”, सुप्रीम कोर्टाने उत्तरप्रदेश सरकारला फटकारले

News Desk

ठरलं! १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात

News Desk