HW News Marathi
Covid-19

निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याने अजित पवारांकडे दिला चेक, अजित पवार लंकेंना म्हणाले…!

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असते तेथील एका दिव्यांग कार्यकर्त्याने त्यांना एक चेक दिला. त्या कार्यकर्त्याने दिलेला तो चेक राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यासाठी होता. चेकवर लिहिलेले निलेश लंकेचे नाव वाचून अजित पवारांनी त्याचक्षणी निलेश लंके यांना फोन त्यांच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे, तो चेक निलेश लंके यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था देखील तातडीने अजित पवार यांनी केल्याचे समजते.

निलेश लंकेसाठी त्या कार्यकर्त्याने दिलेल्या 2100 रुपयांच्या चेकवर निलेश लंके फाउंडेशनचे नाव होते. त्यामुळे, अजित पवारांनी तातडीने निलेश लंकेंना फोन करून याबाबतची माहिती दिली, कौतुक केले आणि त्यांच्या कामासाठी शुभेच्छाही दिल्या. त्याचसोबत, अजित पवारांनी अत्यंत बारकाईने चेकवरचे नाव, दिनांक सर्व माहिती वाचली आणि ती तपासून घेण्याचाही सूचना दिल्या. निलेश लंके यांना हा चेक कसा पोहोचेल, त्यांचे कोणी कार्यकर्ते पुण्यात आहेत जे त्यांच्यापर्यंत चेक पोहोचवू शकतात ते बघण्याच्या देखील सूचनाअजित पवार यांनी दिल्या.

अजित पवार निलेश लंकेंना काय म्हणाले ?

अजित पवारांनी निलेश लंकेंना फोन करून त्यांचे कौतुक करताना म्हटले कि, “तुझे कोव्हिड सेंटरचे काम टीव्हीवर बघून अनेक जण मदत करत आहेत. तुझं काम बघून आपल्या काही कार्यकर्त्यांनाही तुला मदत करायची आहे. एकवीसशे रुपयांचा चेक दिलाय, तो तुझ्याकडे पाठवतोय. तुझं काम उत्तम चालू आहे, असंच काम सुरु ठेवा.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ७२ लाखांवर पोहोचली

News Desk

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली राज्याच्या ‘मिशन बिगिन अगेन’ची माहिती

News Desk

देशात कोरोना रूग्ण संख्या घटली!

News Desk