HW News Marathi
Covid-19

अहंकार सोडा, संपूर्ण देशात ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा !

मुंबई । महाराष्ट्रातली कोरोनास्थिती एकीकडे काहीशी नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे देशातील कोरोनास्थिती मात्र अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता केंद्रातील मोदी सरकारला एक सल्ला दिला आहे. “देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आहेत पण गायब आहेत. म्हणूनच देश रामभरोसे चालला आहे. त्यामुळे आता अहंकार बाजूला ठेवा आणि संपूर्ण देशात ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”, असा सल्ला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. संजय राऊत याबाबत आज (१४ मे) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत केंद्रावर निशाणा साधताना म्हणाले की, “देशात सरकार आहे. पंतप्रधान आहेत. आरोग्य मंत्रीही आहेत. पंतप्रधानही जागेवरच आहेत. पण ह्या सर्वांचे अस्तित्वही दिसणे आवश्यक आहे. त्यांनी गायब होऊन चालणार नाही. कारण, त्यामुळेच देश रामभरोसे चालला आहे. अशाच आव्हानात्मक स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशात महाराष्ट्राने अगदी उत्तम काम केले आहे. त्यामुळे आता अहंकार बाजूला ठेवा आणि संपूर्ण देशात ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा.”

कोरोना काळातील ठाकरे सरकारच्या कामगिरीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात नेहमीच उत्तम काम होत आले आहे. मात्र, तरीही बदनाम करण्याचे कामही नेहमीच केले गेले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने उत्तम काम केलेले आहे. त्यामुळे, केंद्र सरकार, पंतप्रधान आणि देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेल देशात लागू करायला हवे आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई-पुण्यासह राज्यातील अन्य रेड झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी

News Desk

राज्यात आज तब्बल ३२ हजारांहून अधिक जण ‘कोरोनामुक्त’

News Desk

अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील ५ कोटी जनतेस मोफत देणार

News Desk