HW News Marathi
महाराष्ट्र

रेखा जरे हत्या प्रकरण : मुख्य सूत्रधार बाळ बोठेला पोलिसांनी हैदराबादमध्ये ठोकल्या बेड्या

अहमदनगर | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर पोलिसांनी आज (१३ मार्च) पहाटे त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात खून झाला होता. या खुनाच्या कटकारस्थानात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार जरे यांच्या खुनाची सुपारी बाळ बोठे व सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात समोर आलं होतं.

त्यानंतर पोलिसांनी भिंगारदिवे याला अटक केली होती. तर बोठे मात्र फरार झाला होता. फरार होताना त्याने त्याचे दोन्ही मोबाइल घरीच ठेवले होते. पोलिसांनी हे मोबाइल जप्त केलेले आहेत. तसेच बोठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाच पोलीस पथक रवाना करण्यात आलेली होती. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील बोठे याच्या बंगल्याची झडतीही घेतली होती. झडतीत पोलिसांना बोठे याचे रिव्हॉल्वर मिळून आले होते. बोठे याच्याकडे शस्त्रपरवाना असल्याचं तसेच तपासात महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही वस्तूही मिळून आल्या होत्या.

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलेली होती. मात्र, रेखा जरे यांचा खून का करण्यात आला. याचा उलगडा झालेला नव्हता. बोठे याला अटक केल्यानंतर कारण समोर येणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर बोठे याला हैदराबादेत अटक करण्यात आली असून, बोठेला घेऊन पोलिसांचं पथक अहमदनगरला रवाना झालं असल्याचं वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांकडून यांची अधिक माहित दिली जाणार असल्याचं वृत्त आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना मदतीसाठी एक दिवसाचा पगार द्या, सरकारचं कर्मचाऱ्यांना आवाहन

News Desk

आपल्या कार्यकर्त्यासाठी भाजप रस्त्यावर, संजय राऊतांचा भाजपला टोला

News Desk

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आक्रमक, भाजपवर दबाव

News Desk