HW News Marathi
महाराष्ट्र

MPSCExam : विद्यार्थ्यांच्या राहण्याचा सर्व खर्च सरकारने उचलावा,भाजप नेत्याची मागणी

मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. आता लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार २१ मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला होणार आहे. तर ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

सरकारने नवीन परीक्षेची तारीख जाहीर केली असली तरी भाजपकडून अजूनही सरकारवर टीका होत आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारने २१ तारखेला आता #mpscexams होणारं अशी घोषणा केली मात्र या अतिरिक्त सात दिवसाची विद्यार्थांची जबाबदारी घेतली पाहिजे. या परिक्षेला बसणारे बहुसंख्य विद्यार्थी हे गरीब घरातले आहेत. परिक्षेसाठी ते आपल गाव सोडून आलेत. सरकाचा चुकीने या ७ दिवसाचा खर्च विद्यार्थ्याच्या माथी कशाला? या सर्व विद्यार्थ्यांचा सर्व डाटा सरकारकडे आहेच. त्यांच्या राहाण्याची जेवणाची सोय सरकारने केली पाहिजे’, अशी मागणी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांना पुन्हा झटका; मावस भावाच्या घरावर ED ची छापेमारी

News Desk

पोलिस कर्मचारी मारहाण प्रकरणात यशोमती ठाकूर यांना न्यायालयाकडून दिलासा

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा

Aprna