HW News Marathi
Covid-19

पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी, महापौरांनी केली घोषणा

पुणे | पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोठी घोषणा केली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

कोचिंग क्लासेसला परवानगी

स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी सूचना आपण आजच्या पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत केली असता, ती सूचना मान्य करण्यात आली असून नियम पाळून ५० टक्के आसन क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच येत्या २१ तारखेला पूर्व परीक्षा देखील होणार असल्याची घोषण आयोगाने केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या कोचिंग क्लासेसला परवानगी देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत अमित शहा यांची लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

News Desk

नागरिकांनी नियम पाळा, कडक निर्णय घ्यायला भाग पाडू नका! – अजित पवार

Aprna

Weekend Lockdown मध्ये आमदार रवी राणांकडून नियमांचे उल्लंघन, उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी

News Desk