HW News Marathi
महाराष्ट्र

“अधिकाऱ्यांनी मला न विचारताच निर्णय घेतला”, आपल्याच खात्यावर विजय वडेट्टीवारांची नाराजी!

मुंबई | राज्य लोकसेवा आयोगाने गुरुवारी सकाळी MPSCची पूर्वपरीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तेव्हा एमपीएससीकडून या सगळ्याचं खापर आपत्ती निवारण विभागावर फोडलं. ‘आपत्ती निवारण विभागाकडून आम्हाला प्राप्त झालेल्या पत्रानुसारच आम्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला’, असं स्पष्टीकरण एमपीएससीने केल्यानंतर या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी आपली बाजू मांडली असून त्यांनी याचं खापर त्यांच्याच खात्यातील अधिकारी वर्गावर फोडलं आहे!

१४ मार्च रोजी होणाऱ्या नियोजित MPSC पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अवघ्या ३ दिवस आधी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून या निर्णयाचा निषेध करायला सुरुवात केली. पुण्याच्या नवी पेठेमधून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि हळूहळू महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्यार्थी या निर्णयाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

News Desk

“कायम आपलं कौतुक होईल अशी अपेक्षा बाळगू नका”, आव्हाडांनी केली राऊतांची पाठराखण

News Desk

‘बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’ – नितेश राणे

News Desk