HW News Marathi
Covid-19

अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना बैठक सुरु  

पुणे | पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाउनचे शस्त्र उपसायचे का? या बाबतचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (१२ मार्च)) होणार्‍या बैठकीत केला जाईल. दरम्यान, पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थितीत आहेत. या बैठकीनंतर पुण्यात लॉकडाऊन होणार का? याचे चित्रही स्पष्ट होईल

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. हा आकडा अडीच हजारांच्यावरती गेला असल्याचे समोर आले आहे. रुग्णांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. हा आकडा असाच वाढत राहिला तर कडक प्रतिबंध करायचे की लॉकडाऊन पुन्हा एकदा करायचा याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त सौरव राव आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देखील सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन वारंवार करीत आहेत. लोकांना त्यांनी नियम पाळण्याचे आवाहन केलेले आहे. हे नियम पाळले नाही तर त्या त्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. पुण्यातील मास्कच्या कारवाईतून आतापर्यंत २६ कोटी रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. लोक नियमांचे पालन करीत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी ३ रुग्ण महाराष्ट्रात आढळले

News Desk

मराठा आरक्षणासाठी मोदींना साकडे घालणार ! रामदास आठवलेंचा निर्धार

News Desk

स्थलांतरित मजुरांना घरी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, २३ जणांचा मृत्यू

News Desk