HW News Marathi
Covid-19

कोरोनाची तिसरी लाट दारावर, मास्टर प्लॅन तयार करा !

मुंबई । राज्यात कोरोनास्थितीचे आव्हान आहेच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणची कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. मात्र, तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा दिला असल्याने बेसावध राहूनही चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर आता, राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला काही कडक सूचना केल्या आहेत. “नागपूरसह राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून ही समाधानाची बाब आहे. पण म्हणून सुखावून जाऊ नका. कोरोनाची तिसरी लाट दारावर आहे. मास्टर प्लॅन तयार करा”, अशा सूचना नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.

नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (८ मे) एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी बोलताना नितीन राऊत म्हणाले की, “आम्ही गेल्या वर्षभरात 1700 बेडवरून सुमारे 9 हजार बेड निर्माण केले. मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलची सुरुवात केली. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता होईल यासाठी थेट हवाईदलापासून रेल्वेपर्यंत मदत घेतली. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या. आरोग्य यंत्रणेशीसंबंधित मनुष्यबळातही वाढ केली आहे. वर्षभरात केवळ आरोग्यविषयकच काम सुरू असून नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांना मागे टाकले आहे. मात्र तरीही तज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या मते येणारी तिसरी लाट ही अतिशय गंभीर असेल. यामध्ये ही आरोग्य यंत्रणा देखील तोकडी पडू शकते. त्यामुळे युद्धस्तरावर कामाला लागा. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा.”

नितीन राऊत यांनी यावेळी असेही सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्हा हा तातडीने ऑक्सिजन निर्मिती बाबत स्वयंपूर्ण बनविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एकीकडे मानकापूर येथे 900 खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करताना जिल्ह्यात 25 ऑक्सिजन PSA उभारण्याचे नियोजन करावे. ऑक्सिजनची उपलब्धता यावरच पुढे बेडची उपलब्धता अवलंबून असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात 10 ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प पूर्ण करा. कोरोना रुग्णांसाठी 5 हजार जंबो सिलेंडर उपलब्ध करणे पुढच्या लाटेत आवश्यक ठरणार आहे. 1 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा हे उद्दिष्ट ठेवून काम करावे”, असे स्पष्ट निर्देश नितीन राऊत यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रा स्थानकाबाहेर स्थलांतरीत मजूरांनी केली १४ एप्रिलची पुनर्रावृत्ती

News Desk

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

News Desk

गोपीचंद पडळकर कोरोना पॉझिटिव्ह आहेत का? तपासणी करावी रुपाली चाकणकर यांची टीका

News Desk