HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विनायक मेटेंनी मानले सरकारचे आभार 

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्यानं एकीकडे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत नोकरभरती पुढे ढकलावी या आमच्या आवाहनाला आणि कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहून विद्यार्थअयांच्या आरोग्याच्या दृष्टीने १४ मार्चला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, असे ट्विट विनायक मेटे यांनी केले आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. रस्त्यावर झोपून आंदोलन केले जात आहे. ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

News Desk

महाराष्ट्र विधानसभेकरिता योगी आदित्यनाथ यांची मुंबईत सभा

News Desk

सरकारी कार्यालया बाहेर शेतकरी ओतणार शेतमाल, जेलभरोही करणार 

News Desk