HW News Marathi
Covid-19

रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, राज्य सरकारचं ‘प्लॅनिंग’ जोरदार

मुंबई | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकार देखील विविध उपाययोजना करत आहे. राज्यात जास्तीत लोकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला आणखी एक लस उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीसंदर्भात आज महत्वाची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचा साठा आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी संबंधित कंपनीशी चर्चा देखील केली जात आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडसोबत चर्चा करुन ‘स्पुटनिक-व्ही’ उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न केला जात आहे. राजेश टोपे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचा दर ठरविण्याबाबत चर्चा सुरू असल्याची महत्वाची माहिती दिली आहे.

त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनतेला ‘स्पुटनिक-व्ही’ लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशात सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन अशा दोन लसी देण्यात येत आहे. पण अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्याच्या पाठपुराव्यासाठी आणखी लस जनतेला उपलब्ध होऊन जाईल याच उद्देशानं राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजप सरकारची कायरता आहे!

News Desk

पश्चिम बंगालच्या पराभवामुळे चंद्रकांत पाटील डिस्टर्ब झालेत !

News Desk

प्लाझ्मा दान करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

News Desk