HW News Marathi
Covid-19

कवडीची किंमत नसलेल्या बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी…!

मुंबई । राज्यात ठाकरे सरकारने पुन्हा ब्रेक द चैन अंतर्गत लागू असलेले निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ठाकरे सरकारच्या याच निर्णयावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक टीका केली होती. त्यानंतर आता केशव उपाध्ये यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बोचरे प्रत्युत्तर दिले आहे. “ज्यांना पक्षात कवडीची किंमत नाही अशा बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची जबाबदारी त्यांना काही मिळणार नाही”, अशी अत्यंत बोचरी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करत टीका केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “ज्यांना पक्षात कवडीची किंमत नाही अशा बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची जबाबदारी त्यांना काही मिळणार नाही. हातात छोटा मंजिरा घेऊन त्यांनी व माधवरावांनी आयुष्यभर “केशवा माधवा “हे भजन अखंड गात संन्यस्त व्हावं”, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी केशव उपध्येंना सुनावले आहे.

केशव उपाध्ये काय म्हणाले होते ?

राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका करताना केशव उपाध्ये म्हणाले होते की , “लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री म्हणालेच होते, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी!”… सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझा घरखर्च, तुझं लाईटबिल तुच पहा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, पवार साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पुन्हा ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

News Desk

संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका

News Desk

मुंबईसाठी आनंदाची बातमी …..

News Desk