HW News Marathi
महाराष्ट्र

काकडे म्हणतात ठाकरेंची सरकारमध्ये घुसमट होतेय, अजित पवार म्हणतात, बोलणाऱ्याची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा

पुणे | भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी आज (७ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरेंची घुसमट होत आहे आणि ते लवकरच बाहेर पडतील असं काकडे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच पलटवार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत आहे, असा दावा करणारे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अजित पवार यांनी फटकारलं आहे. “त्या व्यक्तीची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा” अशा शब्दात अजितदादांनी संजय काकडेंना टोला लगावला. आज पुण्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार?

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी संजय काकडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजितदादा म्हणाले. “मी पुण्यात आहे. ज्या व्यक्तीने हे स्टेटमेंट केलं, त्याची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा. अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही” म्हणत अजित पवारांनी विषय बदलला.

काय म्हणाले होते संजय काकडे?

संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं, की मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही काकडे म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधीपक्षाचे 19 आमदार निलंबित

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्यासंदर्भात पक्षात दोन मतप्रवाह, शरद पवारांचे मोठे विधान

Aprna

ओला इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीकडून बीड जिल्ह्यातील ग्राहकाची फसवणुकीचा आरोप

Aprna