HW News Marathi
महाराष्ट्र

“लोकप्रतिनिधींना रस्त्यातच अडवा”, उदयनराजेंची मराठा बांधवांना चिथावणी!

सातारा | राज्यातील अतिशय संवेदनशील विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा. गेली अनेक वर्ष हा न्यायालयीन लढा सुरु होता. अखेर यावर सर्वोच्च न्यायालयाने ५ मेला सुनावणी करत मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला. यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. याच विषयावरकायनमच आक्रमक भूमिका मांडणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा बांधवांना चिथावणीच दिली आहे.लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. उदयनराजे यांनी मराठा बांधवांना उघडपणे चिथावणी दिल्याने आगामी काळात मराठा आरक्षणाचा विषय अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित करत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये, त्यापेक्षा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका, असा आदेश मराठा समाजाला दिला आहे.

राज्य सरकारची जबाबदारी नाही का?, उदयनराजेंचा सवाल

कोणत्याही पक्षाचे का असेना त्या आमदार आणि खासदारांना रस्त्यात आडवा, जाब विचारा, मराठा आरक्षणाचं काय झालं हे विचारा, असं सांगतानाच जरी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं असलं तरी राज्य सरकारची काही जबाबदारी नाही का? राज्य सरकार जबाबदारीपासून हात झटकू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

१६ मे पासून मराठा समाजाचा पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर १६ मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं आहे. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही”, फडणवीसांचा राऊतांना टोमणा

News Desk

‘वर्क फ्रॉम होम’मुळे वीज वापरात वाढ | उर्जामंत्री नितीन राऊत

News Desk

एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के वाढ

News Desk