HW News Marathi
महाराष्ट्र

‘मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत,समोरून वार करतात’, आमदार शशिकांत शिंदे भडकले

सातारा | साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर गुरुवारी सकाळी काही लोकांनी दगडफेक केली होती. मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार अपुरं पडल्यानं ही दगडफेक करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. या घडलेल्या दगडफेकीच्या घटनेचा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत निषेध केला आहे. ‘मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत, समोरून वार करतात’ अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली आहे.

मराठा समाजाच्या कालच्या आणि उद्याचा लढ्यात आम्ही सहभागी असू पण एकाच पक्षाला कोणी टार्गेट करणार असेल, तरी आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ. असा प्रकार करणाऱ्यांना पोलिसांनी २४ तासांत अटक करावी. हा प्रकार कोणी घडवून आणला? त्याच्या हेतूचा शोध लागला पाहिजे, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. याचिकाकर्ते सदावर्ते त्यांनी सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. जर याचिकाकर्ते आमचे असते तर त्यांनी अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नसती, असं देखील शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका या समाजाच्या कायम पाठीशी राहणारीच आहे. शांतता भंग करण्याचे काम कोणी करत असेल तर राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लज्जास्पद आहे कंगना राणावत”, उर्मिला- कंगना वादावर डॉ. माधुरी कानिटकर यांची प्रतिक्रिया

News Desk

राज्यातील १२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार !

News Desk

ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावरून आशिष शेलारांचा काँग्रेसला टोला!

News Desk