HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील १२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार !

मुंबई | सीबीएसईचा १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर झाला आणि आता राज्यातील १२ वीचा निकाल उद्या (१६ जुलै) जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण बोर्डाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे,बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहेत. निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या संकेस्थळाला भेट द्यावी.

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com

www.hscresult.mkcl.org

दरम्यान, बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याबद्दलची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यामुळे उद्या नक्की काय निकाल लागणार याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल पंपावर होते लूट ?

News Desk

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर!

News Desk

मराठा आरक्षणावर आज होणार अंतिम निर्णय

News Desk