HW News Marathi
Covid-19

आमच्या जीवाला काही झाले तर शरद पवार, सुप्रिया सुळे जबाबदार !

मुंबई ।”आम्हाला धमक्या येत असून आमच्या जीवितास धोका आहे. आमच्या जीवितास काही झाले तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील”, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणाला विरोध करणारे ऍड जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. राज्यात प्रचंड गाजणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला अंतिम निकाल जाहीर केला. मात्र, आज (५ मे) जाहीर झालेल्या न्यायालयाच्या निर्णयाने ठाकरे सरकार आणि मराठा समाजाला मोठा धक्का बसला, कारण मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. यावर विविध स्तरांतून दिवसभर उलटसुलट प्रतिक्रिया येतच आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाला जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांनी हे गंभीर आरोप आणि दावे केले आहेत.

गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील याविषयी बोलताना म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी मराठा आरक्षणावर स्थगिती आणली तेव्हापासून सगळे आदेश रद्द झाले आहेत. मात्र, निकालांनंतर आम्हाला धमक्या येत असून आमच्या जीवितास धोका आहे. आमच्या जीवितास काही झाले तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील. आम्हाला जे जे धमक्या देतायेत तेच जबाबदार असतील”, असा धक्कादायक आणि गंभीर आरोप आता करण्यात आला आहे.

या आरक्षणाच्या घाणेरड्या राजकारणात शरद पवार उतरले !

जयश्री पाटील याबाबत बोलताना म्हणाल्या की, मराठा आरक्षण कायदेशीर नाही. मात्र, काही पॉवरफूल नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकणारं नव्हतं. निकाल आल्यापासून मला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. अश्लिल शिवीगाळ केली जात आहे.” तर गुणरत्न सदावर्ते याबाबत बोलताना म्हणतात की, “या आरक्षणाच्या घाणेरड्या राजकारणात शरद पवार उतरले. मोगलाई पद्धतीने आरक्षण दिलं जाऊ शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे. मराठा आजही प्रभावशाली आहे. मागासवर्गीयांना जळताना लाकडं दिली जात नाही. या अशा अत्याचारी लोकांना आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं? मोर्चे काढून, मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून आरक्षण मिळत नसतं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आरक्षण मिळतं”, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांची इंडियन ब्रॉडकास्टर्ससोबत बैठक, सावधानता बाळगून निर्मितीविषयक कामेही सुरु करण्याचा विचार

News Desk

तिसऱ्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस, चौथ्या टप्प्यामध्ये काही सेवांना सूटही देण्याची शक्यता

News Desk

‘या’ कारणामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना काशी विश्वनाथ मंदिरात बंदी !

News Desk