HW News Marathi
Covid-19

‘या’ कारणामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना काशी विश्वनाथ मंदिरात बंदी !

मुंबई | देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला होता. यानंतर चव्हाणांच्या सल्लाने राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. आता पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना काशी विश्वनाथ मंदिरात बंदी घालण्यात आली आहे. तसेच देशातील इतर ज्योतिर्लिंगाच्या पुरोहितांनीही चव्हाण कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त आहेत, म्हणून त्यांनी या प्रकारची मागणी केली आहे, असे काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनी म्हटले. दुसरीकडे माझ्या मागणीचा मोदी भक्तांनी आणि भाजप समर्थकांनी वेगळा अर्थ घेतल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण ट्वीटमध्ये म्हणाले, “सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे. यामुळे संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल.”

२० लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१२ मे) देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २० लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. मोदींच्या या निर्णयाचा काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी ठिका केली. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींच्या आर्थिक पॅकेज स्वागत केले.

संबंधित बातम्या

देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे !

चव्हाणांचे डोके ठिकाणावर आहे का?,अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसलेंची जहरी टीका

“काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करुन धार्मिक तेढ निर्माण केली”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०२ दिवसांनंतर न्युझीलंडमध्ये पुन्हा एकदा ४ कोरोना रुग्ण आढळले

News Desk

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलांना गुड न्यूज, सीरम Covovax ची चाचणी सुरु करणार

News Desk

बीडमध्ये इंदुरीकर महाराजांच्या जाहीर किर्तनाला हजारोची गर्दी; कोरोना नियमांचे उल्लंघन

Aprna