HW News Marathi
देश / विदेश

ठरलं! तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार पदाची शपथ

डेहराडून | भाजपचे गढवाल येथील खासदार तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज दुपारी ४ वाजता तीरथ सिंह रावत मुख्ममंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू आहे. त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात नवा मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. आज डेहराडून येथे भाजपच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक झाली. त्यात तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने उत्तराखंडमधील पेच सुटला आहे.

उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय संकट निर्माण झालं होतं. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. भाजपा आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे नाराजीचा सूर लावत तक्रार केली होती. त्यातच त्यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याचंही समोर आलं होतं. या चर्चा सुरू असतानाच रावत यांची मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.

रावत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, अशी चर्चा सुरू होती. यात चार नावे स्पर्धेत असून, त्यापैकी एका नावाची निवड केली जाऊ शकते, असं वृत्त होतं. मात्र भाजपच्या देहरादून येथे झालेल्या बैठकीत चारही नावे बाजूला ठेवण्यात आली आणि तीरथ सिंह रावत यांची निवड करण्यात आली. तीरथ सिंह रावत आज (१० मार्च) सायंकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे. तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडमधील गढवाल लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. खासदार तीरथ रावत हे उत्तराखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. रावत सध्या भाजपाचे राष्ट्रीय सचिव आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान प्रकरणात १ रुपयाचा दंड

News Desk

सैन्यासाठीची मशीन गन खरेदी रद्द

News Desk

भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला – बिपिन रावत

News Desk